कणकवली /-
कणकवली तालूक्यातील नांदगाव व्यापारी ,खोका ,रिक्षा संघटना मिळून एकत्र दिवाळीच्या लक्ष्मीपूजनावेळी गेली अनेक वर्ष नांदगाव तीठा येथे सालाबाद प्रमाणे भरगच्च कार्यक्रम केले जात होते .मात्र यावर्षी सर्व ठिकाणी कोरोनाचे सावट असल्यामुळे येथील संघटनेने यावर्षीचे सर्व कार्यक्रम कोरोनाचा प्रार्दूभाव संपल्यानंतर केले जाणार असल्याची माहीती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पंढरी वायंगणकर यांनी दिली आहे .
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पंढरी वायंगणकर,उपाध्यक्ष मारुती मोरये,सेक्रेटरी कमलाकर महाडीक,खजिनदार दाजी सदडेकर , दाजी मोरये, संजय मोरये ,चंदू मोरये ,सुभाष बिडये ,भाई मोरजकर, ऋषिकेश मोरजकर, संतोष पारकर ,श्रीकांत टाकळे,गोपाळ मोरये,सुनिल साळुंखे आदींनी यावर चर्चा करत निर्णय घेतला आहे.