भातासाठी २२०० रु दर;आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश..
सिंधुदुर्ग /-
पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी भात खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.कुडाळ येथील बजाज राईस मिलमार्फतही थेट शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी करण्यात येणार आहे.शुक्रवार दि.१३ नोव्हेंबर पासून ही भात खरेदी केंद्रे सुरू होणार असून भातासाठी 2200 रु दर देण्यात येणार आहे. भाताची साठवणूक करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनने 20 हजार बारदाने जिल्ह्यात पाठविली आहेत.
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी यावर्षी लवकरात लवकर भात खरेदी केंद्रे सुरू करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी व शासनस्तरावर त्यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.त्याला यश आले आहे.जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीसाठी भात खरेदी केंद्रे निश्चित केली आहेत.शेतकऱ्यांकडून भात खरेदीची कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
तसेच कुडाळ येथील बजाज राईस मिलने गत वर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडून भात खरेदी केले होते.त्यासाठी वेळ लागत होता. बजाज राईस मिलने थेट शेतकऱ्यांमार्फ़त भात खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते.त्याला देखील मान्यता देण्यात आली आहे.आता बजाज राईस मिलमार्फत खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली असून थेट शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी करण्यात येणार आहे.
*जिल्ह्यातील भात खरेदी केंद्रे पुढीलप्रमाणे*
कुडाळ तालुक्यात- कुडाळ , माणगाव, घोटगे, कडावल, कसाल,निवजे, पणदूर,पिंगुळी एमआयडीसी,आंब्रड,हिर्लोक, आरोस,
मालवण तालुक्यात-पेंडूर, आचरा, चौके, कट्टा,विरण
सावंतवाडी तालुक्यात- सावंतवाडी, मळगाव,मडूरा, तळवडे, डेगवे,कोलगाव,मळेवाड, भेडशी, इन्सुलि,
वेंगुर्ले तालुक्यात-वेंगुर्ले, शिरोडा, म्हापण, वेतोरे, तुळस
कणकवली तालुक्यात- कणकवली, कनेडी, फोंडा, तळेरे, खारेपाटण
देवगड तालुक्यात-देवगड, पडेल, पाटगाव, शिरगाव,
वैभववाडी तालुक्यात- वैभववाडी,आचिर्णे व दोडामार्ग या ठिकाणी भात खरेदी करण्यासाठी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.