स्थानिक कमिटी व शाळेच्या वतीने केला सत्कार …
मालवण /-
महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे आयोजित राष्ट्रभाषा प्रवेशीका फेब्रुवारी 2020 परीक्षेमध्ये भ ता चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके ची विद्यार्थिनी कुमारी सानिका शंकर चौकेकर इयत्ता पाचवी हिने कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला या विद्यार्थिनीला हिंदी शिक्षिका सौ गोसावी मॅडम आणि सौ जाधव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनीचे चौके शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई तसेच स्थानिक कमिटी अध्यक्ष बिजेन्द्र गावडे मुख्याध्यापक श्री गावकर सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.