खासदार विनायकजी राऊत यांची माहिती..
सिंधुदुर्ग /-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हयांतील खालील प्रमाणे विषयांकरिता बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. ते खालीलप्रमाणे सोमवार दि. 9 नोव्हेंबर 2020*
*वेळ* – दुपारी 12.00 वाजता, *सभेचे ठिकाण* – सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई.
*सभेचा विषय* – रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हयांतील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक नुकसान
भरपाई देण्यासाठी येणाऱ्या जाचक अटीमध्ये सुधारणा करणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयांचा पर्यटन विकास, शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत येणाऱ्या अडचणी दुर करणे, सिंधुरत्न योजनेची अमंलबजावणी करणे व इतर अनुषंगिक विषयांबाबत
मा.खा.श्री.शरद पवार यांच्या विशेष उपस्थितीत बैठक मा.ना.उदयजी सामंत, मंत्री
उच्च व तंत्रशिक्षण तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्या सूचनेवरुन आयोजित करण्यात
आली आहे.
*या बैठकीसाठीच्या निमंत्रित महनिय व्यक्ती*
मा.पर्यावरण व पर्यटन मंत्री, मा.कृषी मंत्री, मा.सहकार व पणन मंत्री, मा.फलोत्पादन
मंत्री, मा.पर्यावरण व पर्यटन राज्यमंत्री, मा.खा.श्री.विनायकजी राऊत, मा. आमदार श्री.वैभव नाईक,मा.खा.श्री.सुनिलजी तटकरे,मा.अप्पर मुख्य सचिव (वित्त), अप्पर मुख्य सचिव, (नियोजन), मा.प्रधान सचिव (पर्यावरण), मा.प्रधान सचिव (पणन), मा.प्रधान सचिव (सहकार), मा.सचिव (पर्यटन),मा.सचिव (कृषी व फलोत्पादन), मा.आयुक्त, कोंकण
विभाग,मा.जिल्हाधिकारी रत्नागिरी/सिंधुदुर्ग, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी/सिंधुदुर्ग, मा.जिल्हा कृषी अधिकारी ,रत्नागिरी सिंधुदुर्ग यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे.
*सोमवार दिनांक 9 नोव्हेंबर 2020*
*वेळ*- सायंकाळी 5.30 वाजता *ठिकाण*- मा.मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगला मलबार हिल मुंबई
*सभेचा विषय* – मालवण सागरी अभयारण्याबाबतची राज्यवन व महसूल विभागाची मा.मुख्यमंत्री ना.श्री.उद्धवजी
ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखालील बैठक
*या बैठकीसाठीच्या निमंत्रित महनिय व्यक्ती -*
पर्यटनमंत्री ना.श्री.आदित्य ठाकरे, मा.खा.श्री.विनायकजी राऊत साहेब, मा. आमदार श्री.वैभव
नाईक, मा.प्रधान सचिव – पर्यटन, मा.व्यवस्थापकीय संचालक एम.टी.डी.सी, अप्पर प्रधान
वनसंरक्षक (कांदळवन) मा.वनमंत्री व वनराज्य मंत्री व सिंधुदुर्ग जिल्हयाच्या जिल्हाधिकारी मा.के.मंजुलक्ष्मी यांना मुख्यमंत्री सचिवालयाकडून आमंत्रित करण्यात आलेले आहे.
*सोमवार दि. 9 नोव्हेंबर 2020*
*वेळ*-सायंकाळी ठिक 6.00 वाजता
*ठिकाण*- मा.मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगला मलबार हिल मुंबई
*सभेचा विषय* – जिल्हयातील वनसंज्ञेबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांनी बैठक आयोजित केलेली आहे.
*या बैठकीसाठीच्या निमंत्रित महनिय व्यक्ती -*
वनविभागाचे मा.मंत्री व राज्यमंत्री, मा.खा.श्री.विनायकजी राऊत साहेब, मा. आमदार श्री.वैभव नाईक, मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर व जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना मा.मुख्यमंत्री सचिवालयाकडून आमंत्रित करण्यात आलेले आहे.