कोल्हापूर /-
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजीत आपटे तसेच कोल्हापूरचे माजी महापौर व ऑल इंडिया इलेक्शन कमिशन चेअरमन माननीय सुभाष पाटील साहेब व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप जी हराळे संपर्कप्रमुख हेमंत केळकर यांच्या चर्चेतून पुणे शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी शिक्षक उमेदवार म्हणून महिला उमेदवार रूपाली बोचगेरी यांची निवड करण्यात आली पक्षाकडे एकंदर तीन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले त्यात रूपाली बोचगेरी यांनी उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली असून निवडणूक लढण्याचा उद्देश्य जाहीर करताना त्यांनी शिक्षक वर्गाच्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये केवळ शिक्षक भरती किंवा हंगामी शिक्षक कायम करून घेणे याबरोबरच महत्त्वाचा विषय मांडला तो म्हणजे, शाळाही कन्सेप्टच भविष्यात महाविकासआघाडी तसेच केंद्रातील एनडीए सरकार बंद करणार आहे त्यामुळे शाळाही कन्सेप्टच नाहीशी झाली आणि सर्व शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले तर फक्त काॅर्पोरेट कंपन्यांचा फायदा होणार असुन शाळेतील गुरू-शिष्याचं नातं असलेला शिक्षक विद्यार्थी अस्तित्वात राहणार नाही तेव्हा मुख्य लढा हा आता अस्तित्वाचा आहे जर नोकरीच राहिली नाही शालेय शिक्षण विभाग बंद झाला तर आपोआपच आरक्षण संपणार आहे त्यामुळे आरक्षण बचाव मोहिमे सोबतच शिक्षक आणि शाळा बचाव यासाठी सभागृहात जाऊन त्या आवाज उठवणार आहेत हा विचार पूर्णपणे वेगळा ठरल्यामुळे रूपाली बोचगेरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि सर्व शिक्षकांमध्ये जागृती घडवण्यासाठी सर्व शिक्षकांनी पुढे यावे असा आवाहन देखील केलं शिक्षक संघटनांच्या बरोबर जोडलेले सर्व शिक्षक वृंद तसेच नोंदणीकृत नसलेले सर्व शिक्षक यांनी शाळा वाचवण्यासाठी नोंदणीकृत शिक्षकांना शिक्षित करण्याची वेळ आलेली आहे तेव्हा प्रस्थापित आरक्षण विरोधी तसेच शाळा विरोधी राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले आहे कोणत्याही प्रकारे प्रस्थापित मानसिकतेला छेद देत पक्ष तेच फक्त चेहरे वेगळे ही भूमिका सोडून द्यावी व माझ्यासारख्या नवोदितांना संधी द्यावी त्यासाठी शाळा मालकांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे असा आवाहन केलं सकाळी पुणे विभागीय निवडणूक निरीक्षकांकडून उमेदवारी अर्ज रूपाली बोचगेरी यांनी स्वीकारला