सावंतवाडी /-
सावंतवाडी येथील तालुक्यातील चौकुळ गावात जाणारे सावंतवाडी कुंभवडे एसटी बस बंद असल्याने नागरिकांची परवड होत होती याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने येथील आगार प्रमुखांची भेट घेऊन हे बस सेवा सुरू करण्याबाबत काल निवेदन तसेच गावकऱ्यांच्या सह्यांचे पत्र ही दिले होते याची दखल घेत प्रशासनाने सावंतवाडी चौकुळ कुंभवडे ही बस सेवा तातडीने सुरू केली आहे याबाबत ग्रामस्थांनी मनसेचे आभार मानले आहे गेले काही महिने एसटी प्रशासनाच्या बस सेवा बंद असल्याने नागरिकांची परवड होत आहे गावात जाणारी सावंतवाडी (चौकुळ) कुंभवडे हे बस सेवा बंद असल्याने कुंभवडे चौकुळ तसेच या मार्गावरील असलेल्या गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त ये जा करण्यासाठी स्वतःची वाहन किंवा खाजगी वाहनांच्या माध्यमातून यावे लागत होते याबाबत मनसेने दखल घेत येथील आगार प्रमुख श्री पाडोळे त्यांची भेट घेत काल ही समस्या मांडत तसे निवेदनही दिले दरम्यान एसटी प्रशासनाने तातडीने या निवेदनाची दखल घेत आज चौकुळ कुंभवडे ही बस सेवा पूर्ववत केली आहे. यावेळी उपस्थित मनसेचे एसटी कामगार सेना कार्याध्यक्ष संतोष भैरवकर सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार तालुका सचिव विठ्ठल गावडे चौकुळ उपविभाग अध्यक्ष गौरेश गावडे उपशहर अध्यक्ष शुभम सावंत सचिव आकाश परब आधी पदाधिकारी उपस्थित होते.