कृषि सेल जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशाने करण्यात आली नेमणूक, राष्ट्रवादीचे नेते सुरेशभाई दळवी यांनी दिले पत्र..
दोडामार्ग /-
दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिवसेंदिवस मजबुती करणाकडे लक्ष देत असून अनेक विभाग अध्यक्षांची नेमणूक करून त्यांना जबाबदारी सोपवत आहेत, आज दोडामार्ग राष्ट्रवादी कृषी सेल अध्यक्षपदी गौरेश गवस यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेशभाई सावंत यांच्या हस्ते त्यांना आज नेमणूक पत्र देण्यात आले. ही निवड राष्ट्रवादी कृषी सेल जिल्हाध्यक्ष समिर आचरेकर यांच्या आदेशाने करण्यात आली.यावेळी सुरेशभाई दळवी, गौरेश गवस, संदीप गवस, बाबी बोर्डेकरअभिजित गवस, प्रदीप चांदेलकर, सुशांत राऊळ, उल्लास नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.