कुडाळ /-
आज २ नोव्हेंबर सहकार महर्षी कै.शिवराम भाऊ जाधव यांची पुण्यतिथी. शिवराम भाऊ जाधव यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त कुडाळ तालुका खरेदी विक्री केंद्र येथील शिवराम भाऊ जाधव यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कै.शिवराम भाऊ जाधव यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मा.श्री.प्रसाद रेगे,कुडाळ तालुका अध्यक्ष श्री.भास्कर परब ,ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर ,जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे ,जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुनील भोगटे,सहकार महर्षी आत्मारामभाई ओटवणेकर,शहराध्यक्ष संग्राम सावंत , अशोक कांदे,काका कुडाळकर ,उत्तम सराफदार ,लालू पटेल,नझीर शेख अन्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.