सिंधुदुर्ग मंडप लाईट साउंड इव्हेंट्स केटरर्स असोशिएशनचे उद्द्या १ दिवशीय लाक्षणिक उपोषण..

सिंधुदुर्ग मंडप लाईट साउंड इव्हेंट्स केटरर्स असोशिएशनचे उद्द्या १ दिवशीय लाक्षणिक उपोषण..

सिंधुदुर्ग जिल्हा मंडप लाईट साऊंट इन्हेंट्स केटरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रणय तेली यांची माहिती

कुडाळ /-

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून तमाम महाराष्ट्रातील बंद असलेला मंडप लाइट, साउंड, इन्हेंट, केटरिंग व्यवसाय पूर्ववत सुरू न झाल्यास या व्यावसायिकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, याची जाणीव करून देण्यासाठी सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी तमाम महाराष्ट्रातील सर्व मंडप डेकोरेटर्स, साऊंड, इव्हेंट, केटरिंग, व्यवसायिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

ऑल महाराष्ट्र टेंट डीलर वेल्फेअर ऑर्गनायझेशन संलग्न असलेली सिंधुदुर्ग जिल्हा मंडप लाईट साऊंट इव्हेंट्स केटर्स असोसिएशन या लाक्षणिक उपोषणात सहभागी होणार आहे कोरोना च्या काळामध्ये आम्हा व्यावसायिकांना फार मोठी झळ बसलेली आहे पुन्हा आपला व्यवसाय जोमाने सुरू व्हावा म्हणून हा प्रयत्न आहे. आठ महिन्यापासून आमचा व्यवसाय बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

शासनाने किमान याचशे निमंत्रितांच्या उपस्थितीत कोरोंनाला प्रतिबंध असणारे नियमांच्या अधीन राहून लग्न समारंभ आदिना परवानगी देऊन आम्हा व्यवसायिकांची उपासमारीतून सुटका करावी या मागणीसाठी महाराष्ट्रभर लाक्षणिक उपोषण केले जात आहे.

सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी चार या वेळेत सावळी पद्धतीने सोशल टिस्टंसिंग चे भान राखून एक दिवशीय धरणे आंदोलन सिंधुदुर्ग जिम्हा मंडप लाईट सहऊंड इब्हेंट केटरर्स असोसिएशन तर्फे केले जाणार आहे.

आमच्या प्रमुख मागण्या…

1• सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंडप, लॉन, मंगल कार्यालय, हॉलच्या क्षमतेपेक्षा अध्या लोकांच्या आसन अमतेची परवानगी देण्यात यावी किंवा पर्यायी पाचशे व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमाची परवानगी देण्यात यावी.
2• मंडप, मंगल कार्यालय, इव्हेंट मॅनेजमेंट, साऊंट, लाईट, डेकोरेशन इतर व्यवसायाशी संबंधित जीएगटी 18 टे ऐवजी पाच टक्के पर्यंत करण्यात यावा.
ও• बन्याच व्यवमाविकांनी साहित्य ठेवण्यासाठी गोदाम, मंगल कार्यालय भाऊ्याने पेतलेली आहेत, परिस्थिती
सामान्य होईपर्यंत त्याने भाडे घेऊ नये असे निर्देश कायद्यात समाविष्ट मकारावेत.कर्मचाऱ्यांच्या पीएफ मध्ये सवलत व स्थिती सामान्य होईपर्यंत शासनाने त्याची जवाबदारी घ्यावी.
5• मंडपामध्ये होणा्या विवाह समारंभाच्या वर लागणाऱ्या जीएसटी वधूपित्याला परत मिळण्याची तरतूद करावी कारण हिंदू विवाह धर्मानुसार कन्यादान एक संस्कार आहे तो सामाजिक उत्सव नाही.
6• व्यवसायासाठी ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांचे व्याज माफ करावे प्रत्येक महिन्याचा हप्ता स्थिती सामान्य होईपर्यंत चालू करण्यात येऊ नये.
7• सर्व मंडप,लाईट, साऊंड, इव्हेंट मॅनेजमेंट केटरर्स व्यवसाय धारकास उद्योगाचा दर्जा दिला जावा त्यामुळे त्यांचा रोजगार व व्यवसाय चालवण्यासाठी बँकेकडून कर्ज सहज प्राप्त होऊ शकेल.
8• मंडप लाईट साऊंड इव्हेंट मॅनेजमेंट केटरर्स या व्यवसायाशी संबंधित सर्व व्यवसायधारकानी घेतलेल्या कर्जावर सत्सिडीची तरतूद करावी.
9• मंडप लाईट साऊंड इव्हेंट मॅनेजमेंट केटरर्स या सेवांचा इसेन्शियल सर्विसेस मध्ये सहभाग करावा
10• मंडप लाईट साऊंड इव्हेंट मॅनेजमेंट केटरर्स व्यवसायातील सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म व्यवसायिकांच्या खात्यात मदत राशी जमा करावी या व्यवसायाच्या अडचणी लक्षात घेऊन वेगळ्या मदत पॅकेजची घोषणा करावी.
11• ज्या मंडप लाईट साऊंड इव्हेंट मॅनेजमेंट केटरर्स व्यावसायिकांनी शासनाची कामे केलेली आहेत त्यांची बिले लबकरात लवकर अदा करावीत म्हणजे ते आपल्या आर्थिक अडचणी सोडऊ शकतील.
12• मंडप लाईट साऊंड इव्हेंट मॅनेजमेंट केटरर्स या या व्यवसायाशी संबंधित लावल्या जाणाऱ्या सर्व करांमध्ये उदाहरणार्थ कमर्शियल हाऊस टॅक्स वॉटर टॅक्स, कचरा निवारण टॅक्स इत्यादी टॅक्समध्ये सूट मिळावी.शासनाने मंडप लाईट साऊंड इव्हेंट मॅनेजमेंट केटरर्स संबंध व्यवसाय धारकांचा बरील सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार,करावा म्हणून हे लाक्षणिक उपोषण आम्ही करत आहोत.असे सिंधुदुर्ग जिल्हा मंडप लाईट साऊंट इन्हेंट्स केटरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रणय तेली यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून म्हटले आहे.

अभिप्राय द्या..