कुडाळ /-
कुडाळ नगरपंचायत क्षेत्रात काही मच्छी विक्रेत्यांकडुन मच्छी मार्केट व्यतिरिक्त इतरस्त ठिकाणी बसुन किलोच्या दराने मच्छी विक्री करत असल्याने त्याचा परिणाम मच्छीमार्केट मधिल मच्छी विक्रेत्यांवर होत आहे,या प्रकारामुळे मच्छीमार्केट मध्ये ग्राहक येत नसल्याने मच्छीमार्केट ओस पडणार असून, त्याचा फटका सर्वाना बसणार आहे. यामुळे सर्वच मच्छी विक्रेत्यांनी मच्छी मार्केट्स मध्ये मच्छी विक्री करावी अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी स्पष्ट केले आहे.
कुडाळ नगरपंचायत हद्दीतील वेंगुर्ले-कुडाळ महामार्गावरील वेंगुर्लेकर वाडी नजीक ररत्त्यावर गेल्या लाॅकडाउन काळापासून मालवण येथील मच्छीविक्रेता अमित आडारकर हे किलो होलसेल दराने मच्छी विक्री करत होते.मात्र काल शनिवारी आडारकर यांची माणसे वेंगुर्लेकर वाडी नजीक ररत्त्यावरील बाजूला मच्छी विक्री करताना अचानक
कुडाळ मच्छी मार्केटमधील मच्छी विक्री करत असलेल्या सर्व महिलांनी मच्छी मार्केटमध्ये कोणी येत नसल्याने,आक्रमक पवित्रा घेत वेंगुर्लेकर वाडी नजीक बसलेल्या मालवण येथील मच्छी विक्रेत्याला धारेवर धरीत आजपासून याठिकाणी येथे मच्छी विकायची नाही.मच्छी मार्केट मध्ये येऊनचं तेथे विकायची असे ठणकावून सांगितले.तर यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सर्व महिलांची बाजू ऐकून घेत तुमच्यावर अन्याय होणार नाही, असे सांगत सर्वानी नगरपंचायतीला सहकार्य करून, मच्छीमार्केट मध्येच बसुन मच्छी विक्री करावी.असे सांगितले.यावेळी आलेल्या महिलांनी तेली यांचे आभार मानले.
दरम्यान कुडाळ नगरपंचायत क्षेत्रात काही मच्छी विक्रेत्यांकडुन मच्छी मार्केट व्यतिरिक्त इतरस्त ठिकाणी बसुन किलोच्या दराने मच्छी विक्री करत असल्याने त्याचा परिणाम मच्छीमार्केट मधिल मच्छी विक्रेत्यांवर होत आहे,या प्रकारामुळे मच्छीमार्केट मध्ये ग्राहक येत नसल्याने मच्छीमार्केट ओस पडणार असून, त्याचा फटका सर्वाना बसणार आहे. यामुळे सर्वच मच्छी विक्रेत्यांनी मच्छी मार्केट्स मध्ये मच्छी विक्री करावी अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी स्पष्ट केले आहे.