कणकवली /-

कणकवली बाजारपेठत सदानंद बाणे यांच्या दुकानाला लागलेली आग विझविण्यात नगरपंचायतचे सत्ताधारी आणि नगरपंचायतीचा अग्निशामक बंब हतबल ठरले. आग विझविण्यासाठी गेलेल्या अग्निशामक बंबात पाणीच नव्हते याचा प्रत्यक्ष अनुभव कणकवलीच्या जनतेने घेतला.अत्यावश्यक सेवेतही नगरपंचायतीचा हलगर्जीपणा दिसून आला. सत्ताधाऱ्यांचे हे अपयश आहे.अशी टीका विरोधी गटाचे शिवसेना नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी केली आहे.

कणकवली नं प च्या अग्निशामक बंबावर खास हजारो रुपये खर्च करून सुधारणा तसेच दोन ड्रायव्हरांची नेमणूक केलेली आहे .सकाळ आणि रात्री साठी 24×7 सेवा देण्यात येईल असेही अनेक वेळा ऐकलं आहे. परंतु आज सकाळी ज्यावेळी कणकवली शहरात आग लागली तेव्हा त्या अग्निशामक बंबाचा कोणीच वाली नाही हे दिसून आले.आग विझविण्यासाठी आलेल्या नगरपंचायतीचा अग्निशामक बंबात पाणीच नव्हतं. ही बाब अतिशय गंभीर आहे.शहरातील जनतेने याचा अनुभव घेतला.आज पाण्या अभावी त्या आगीत जीवित हानी घडली असती तर कोण जबाबदार राहिला असता? असा सवाल रुपेश नार्वेकर यांनी करत नगरपंचायतीच्या हलगर्जीपणाची चौकशी होणे गरजेची आहे.आम्ही मुख्याधिकारी यांच्या जवळ सदर घटनेची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करणार आहोत. असे श्री नार्वेकर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page