मालवण /-

येथील गोट्या येरम या तरुणाने व्हेंटिलेटरसह अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशा उपलब्ध करून दिलेल्या ‘कार्डिअक’ रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज ज्येष्ठ डॉ. शशिकांत झाटये यांच्या हस्ते करण्यात आले. मालवणातील ही दुसरी कार्डिअक रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत दाखल झाली आहे.
गंभीर स्थितीतील रुग्णांना अधिक उपचारासाठी नेण्यासाठी ‘कार्डिअक’ रुग्णवाहिकेची आवश्यकता भासते. याच दृष्टीने गोट्या येरम या तरुणाने पुढाकार घेत ही रुग्णवाहिका मालवणवासीयांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णवाहिकेवर डॉक्टरही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह परिसरात या रुग्णवाहिकेचे आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, गोट्या येरम, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, यतीन खोत, दीपक पाटकर, गणेश कुशे, पूजा सरकारे, महेंद्र म्हाडगूत, मोहन वराडकर, नितीन मांजरेकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.

रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी त्यांचे प्राण वाचावेत. हाच आपला मुख्य उद्देश आहे. त्यामुळे अत्यंत माफक दरात ही रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी तत्पर असेल असे गोट्या येरम यांनी सांगितले. ‘कार्डिअक’ रुग्णवाहिका सेवा उपलब्धतेसाठी मोबा. ९४२२१२११२८ या नंबरवर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले. कोरोना काळात अत्यावश्यक स्थितीत प्रसंगी रुग्णांना ने-आण करणे. मृतदेह आणणे व अंत्यसंस्कार यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून गोट्या याने सेवा दिली व देत आहे. आपल्या तत्पर सेवेतून गोट्या याने एक आदर्श निर्माण केला आहे. गंभीर रुग्णांना अतिजलद सेवा मिळण्यासाठी कार्डिअक रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्याने घेतलेल्या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page