सिंधुदुर्गातील स्थापत्य अभियंता सुशिक्षित बेरोजगारांना आशेच नवं किरण…

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील स्थापत्य अभियंत्याननी एकत्र येऊन आज पावशी येथिल शांतादुर्गा मंगल कार्यालय सभागृहात स्थापत्य अभियंता सुशिक्षित बेरोजगार संघटनेची स्थापना केली. युवकांच्या समस्यांना नेहमीच वाचा फोडणारे सन्मानिय उदय पाटील यांना संघटनेचे जिल्हा संघटक तथा कार्याध्यक्ष पदाचा पदभार सोपविण्यात आला. पावशी गावचे सुपुत्र युवा सामाजिक कार्यकर्ते सागर संतोष भोगटे यांची या संघटनेच्या अध्यक्षपदी बिनवरोध निवड करण्यात आली तर देवगडचे सुपुत्र हर्षवर्धन कदम यांना उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग हा एक शंभर टक्के साक्षर असलेला जिल्हा आहे. दरवर्षी दहावी, बारावीच्या बोर्डाच्या निकालात सिंधुदुर्ग सर्वोच्च स्थानावर असतो. दहावी, बारावी नंतर बरेच युवक अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांमध्ये गुणवत्तेची कमी नाही पण याच गुणवान सिंधुदुर्गात आज स्थापत्य अभियंता ना बेरोजगारीची समस्या भेडसावत आहे. सिंधुदुर्गातील स्थापत्य अभियंता रोजगारासाठी मुंबई, पुणे सारख्या शहरावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत पण कोरोणामुळे स्थापत्य क्षेत्र ठप्प असल्याने स्थापत्य अभियंत्यांना बेकारीला सामोरे जावे लागत आहे. कारण सिंधुदुर्गात स्थापत्य क्षेत्रात रोजगार मिळविण्याचे मार्ग खूप कमी आहेत. इथल्या एम.आय डी.सी. मरणासन्न अवस्थेत आहेत तर सरकारी नोकऱ्यावर परजिल्ह्यातील युवकांचा वर्चस्व आहे. स्थापत्य अभियंत्यांना रोजगार मिळवून देणारे कोणतेही मोठे उद्योग धंदे येथे उपलब्ध नाहीत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर या संघटनेची स्थापना होणे म्हणजे इथल्या स्थापत्य अभियंत्यांना एक आशेचा नवा किरण आहे. हि संघटना स्थापत्य अभियंत्यांच्या समस्येला वाचा फोडून स्थापत्य अभियंत्यांनच्या न्याय हक्कासाठी लढेल अशी आशा इथल्या बेरोजगार अभियंत्यांना आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यातील स्थापत्य अभियंते या संघटनेचत सामील झाले आहेत. या संघटनेच्या पुढील वाटचालीस कोकण लाईक ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या हार्दिक शुभेच्छा.
सिंधुदुर्ग स्थापत्य अभियंता बेरोजगार संघटनेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
कार्याध्यक्ष उदय पाटील, अध्यक्ष सागर संतोष भोगटे (पावशी,कुडाळ), उपाध्यक्ष हर्षवर्धन कदम (देवगड), सचिव संजय चोडणकर (सावंतवाडी), खजिनदार निखिल नेमळेकर(मालवण), प्रतिनीधी पुढीलप्रमाणे वेंगुर्ले शुभम वैद्य, किरण परूळेकर, कणकवली व्यंकटेश सावंत, दोडामार्ग स्वप्निल देसाई, वैभववाडी रामचंद्र बावदाणे, सावंतवाडी प्राची नार्वेकर, निकीता चोडणकर, कुडाळ पूनम वारंग.अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page