कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लवकर लस उपलब्ध व्हावी याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच मोठी बातमी समोर आली आहे.

*मृत्यू* : सर्वांचे लक्ष लागलेल्या ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोरोना लशीची चाचणी सध्या सुरू आहे. या चाचणीदरम्यान एका वॉलेंटियरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

*चाचणी सुरू* : कोरोना विरूद्धच्या लढातील सर्वात महत्त्वाची लस समजली जाणारी ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि AstraZeneca तयार केलेली कोरोना लशीची सध्या जगभरात चाचणी सुरू आहे.

*चाचणी* : या चाचणीदरम्यान एका वॉलेंटियरचा मृत्यू झाला असून ही चाचणी थांबली जाणार नाही असेही सांगितले जात आहे.

▪️ब्राझिलच्या आरोग्य आणि प्राधिकरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी कोरोना लशीच्या चाचणीत सहभागी झालेल्या एका वॉलेंटियरचा मृत्यू झाला.

▪️मृत्यूचे कारण कोरोनाची लस नसल्याचेही विभागाने सांगितले असून लशीची चाचणी थांबवली जाणार नाही ती सुरू राहिल अशी माहिती दिली आहे.

*खळबळ* : या घटनेमुळे खळबळ उडाली असली तरी या वॉलेंटिरच्या मृत्यूचे नेमके कारण काय याबाबत अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page