तुम्ही जर सच्चे ‘योगी’ असाल तर मी पाकिस्तानचा प्रशंसक आहे हे सिद्ध करुन दाखवा; ओवैसींचं योगींना आव्हान..

तुम्ही जर सच्चे ‘योगी’ असाल तर मी पाकिस्तानचा प्रशंसक आहे हे सिद्ध करुन दाखवा; ओवैसींचं योगींना आव्हान..

नवी दिल्ली /-

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि राहुल गांधी पाकिस्तानचे प्रशंसक आहेत,अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती.त्यांच्या या टीकेनंतर ओवैसी चांगलेच भडकले आहेत. ‘तुम्ही जर सच्चे ‘योगी’ असाल तर मी पाकिस्तानचा प्रशंसक आहे हे सिद्ध करुन दाखवा’, असं आव्हान असदुद्दीन ओवैसींनी योगींना दिलं आहे.

‘मी योगी आदित्यनाथांना आव्हान देतो की ते जर सच्चे योगी असतील तर 24 तासाच्या आत त्यांनी मी पाकिस्तानचा प्रशंसक असल्याचं सिद्ध करावं. त्यांच्या वक्तव्यावरुन त्यांची निराशा दिसून येते. त्यांना हे माहिती नाही का की मी पाकिस्तानात गेलो होतो आणि तिथे भारतीय लोकशाहीबद्दल भरभरून बोललो’, अशा शब्दात ओवैसींनी योगींना सुनावले

ओवैवी काँग्रेस-आरजेडीवरदेखील तुटून पडले. ‘बिहार विधानसभा निवडणूक जिंकण्याइतपत काँग्रेस आणि आरजेडीची ताकद नाही.भाजपावर मात करण्यासाठी त्यांच्यात बौद्धिक प्रामाणिकपणा नाही ना आत्मविश्वास. दोन्ही पक्षांकडे निवडणूक जिंकण्यासाठी जे राजकीय चातुर्य लागतं किंवा रणनिती लागते, त्याचा अभाव आहे’, अशी सडकून टीका त्यांनी काँग्रेस-आरजेडीवर केली.

योगी आदित्यनाथ काय म्हणाले होते?
योगी आदित्यनाथ हे बिहारमधील जमुई विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार श्रेयसी सिंग यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेत बोलत होते. या दरम्यान ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे. देशातील तरुणांना माहित आहे. राहुल गांधी आणि ओवैसी हे पाकिस्तानधार्जिने आहेत तसंच ते पाकिस्तानचे प्रशंसक आहेत’.
ओवैसींचं योगींना उत्तर
‘मी योगी आदित्यनाथांना आव्हान देतो ती ते जर खरे योगी असतील तर 24 तासाच्या आता त्यांनी मी पाकिस्तानचा प्रशंसक असल्याचं सिद्ध करावं. त्यांच्या वक्तव्यावरुन त्यांची निराशा दिसून येते. त्यांना हे माहिती नाही का की मी पाकिस्तानात गेलो होतो आणि तिथे भारतीय लोकशाहीबद्दल भरभरून बोललो’.

अभिप्राय द्या..