मसुरे /-
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्याची १९ ऑक्टोबर अशी मुदत होती ती वाढवून २ नोव्हेबर अशी करण्यात आली आहे. तरी इच्छुक शेतक-यांनी तालुका क्रुषि अधिकारी कार्यालय येथे किंवा mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर अर्ज करावेत.
यामध्ये प्रकल्प खर्च ४.६० असुन ५० टक्के २.३० लाख अनुदानीत योजना आहे. वैयक्तिक शेतकरी, नोंदणीकृत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचतगट सहभाग घेऊ शकतात.
महिला कृषी पदविधारकांना प्रथम प्राधान्य असून महिला गट/महिला शेतकरी व्दितीय प्राधान्य, भाजीपाला उत्पादक अलर्ट व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना त्रुतिय प्राधान्य राहील.या योजनेत १००० चौ.मी.आकाराचे शेडनेट,१००० चौ.मी.प्लॅस्टिक टनेल,पाॅवर नॅपसॅक स्प्रेअर व प्लॅस्टिक क्रेटस असणे बंधनकारक आहे.स्वमालकिची जमीन किमान ४० गुंठे,पाण्याची मुबलक सोय असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा संबंधित गावपातळीवर कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी श्री.विश्वनाथ गोसावी यांनी केले आहे.