अखेर बंडू हर्णे यांची कणकवली उपनगराध्यक्षपदी वर्णी..

अखेर बंडू हर्णे यांची कणकवली उपनगराध्यक्षपदी वर्णी..

कणकवली /-

कणकवली उपनगराध्यक्षपदी गणेश उर्फ बंडू हर्णे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने हर्णे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पीठासन अधिकारी तथा कणकवली प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांनी ही निवड जाहीर केली.

या निवडी पूर्वी पीठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या नगरसेवकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. त्यानंतर इतर प्रक्रिया पूर्ण करत पीठासीन अधिकाऱ्यांनी हर्णे यांचे नाव जाहीर केले. या निवडीनंतर बंडू हर्णे यांचे नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत आदींनी अभिनंदन केले. दरम्यान निवडीनंतर बोलताना हर्णे म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, यांनी माझ्यावर विश्वास दाखवत माझ्यावर जी जबाबदारी सोपवली ती निश्चितच नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यासाठी मी येत्या काळात प्रयत्न करणार आहे.

तसेच कणकवली शहराच्या विकासाच्या दृष्टीने माझे जास्तीत जास्त योगदान देण्याचा मी प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया हर्णे यांनी दिली.

अभिप्राय द्या..