मालवण /-
लॉकडाऊन काळात बंद असलेल्या आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवासी वाहतुकीस ऑगस्ट महिन्यात शासनाने परवानगी दिल्यानंतर मालवण एसटी आगरातून लांब व मध्यम पल्ल्याच्या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती मालवण आगार प्रमुख श्री . नरेंद्र बोधे यांनी दिली
या बस फेऱ्यांची यादी व वेळापत्रक मालवण आगाराने जाहीर केली असून
यामध्ये ०४.५० वा. मालवण- बार्शी,०५.३० वा. मालवण- पुणे निगडी (शिवशाही), ०६.०० वा. मालवण- रत्नागिरी, ०६.३० वा. मालवण- तुळजापूर, ०७.०० वा. मालवण -पुणे निगडी (साधी बस), ०८.०० मालवण – मुंबई सेंट्रल (निमआराम), ०९.३० वा. मालवण- कोल्हापूर, ११.३० वा. मालवण- रत्नागिरी, १४.१५ वा. मालवण – कोल्हापूर, १५.३० वा. मालवण – कोल्हापूर, १६.०० वा. मालवण – बोरिवली (शयन -आसनी, निमआराम दरात), १६.३० वा. मालवण- पुणे निगडी (शिवशाही), ०६.४५ वा. मालवण – पणजी (निमआराम) आदी बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
तसेच परिवहन महामंडळाकडून प्रवासी मासिक पास, व त्रैमासिक पास, आवडेल तेथे प्रवास पास तसेच ज्येष्ठ नागरिक सवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवशाहीच्या आवडेल तेथे प्रवास पासावर शयन आसनी बसमधून प्रवास करता येणार आहे. तरी जास्तीत जास्त प्रवासी वर्गाने या बसफेऱ्यांचा व सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण आगाराने प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.