मालवण /-
मालवण पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी म्हणून जे. पी. जाधव यांनी आज पदभार स्वीकारला. सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी त्यांचे स्वागत केले.
येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून राजेंद्र पराडकर यांच्याकडे प्रभारी पदभार होता. ते सध्या जिल्हा परिषदेत उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार आज त्यांनी मालवण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी सभापती पाताडे, उपसभापती परुळेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर, पंचायत समिती सदस्य सोनाली कोदे, गायत्री ठाकूर, निधी मुणगेकर, मनीषा वराडकर, मधुरा चोपडेकर, विनोद आळवे, कमलाकर गावडे, अशोक बागवे यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांना एकत्र घेत तालुक्याचा विकास साधू असे नूतन गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनी सांगितले. गटविकास अधिकारी म्हणून गेली अकरा वर्षे श्री. पराडकर यांनी केलेल्या कामाचे यावेळी सभापती पाताडे, उपसभापती परुळेकर यांनी कौतुक केले.