वेंगुर्ला /-
परतीच्या पावसामुळे तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन सरकारकडे अहवाल सादर करुन शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी भाजपा किसान मोर्चा वेंगुर्लेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली.
यंदा अनुकूल हवामानामुळे शेतकऱ्यांच्या हाती चांगले भात पीकाचे उत्पन्न येण्याची शक्यता होती.त्यामुळे बळीराजा आनंदीत होता.मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण टाकले आहे.कापणी केलेली भातपीके शेतकऱ्यांच्या डोळयादेखत पाण्याखाली गेल्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे .परतीच्या मुसळधार पावसाने भातशेतीचे ७० % नुकसान झाले आहे . तालुक्यातील कित्येक गावातील शेतीची पहाणी केली असता अनेक ठिकाणी भातपीक आडवे होऊन कोंब आलेले आहेत.
विशेषतः बियाणे जमीनीतुन पुर्ण कुजुन पुन्हा कोंब आलेले आहेत .त्याचबरोबर अनेक ठिकाणी भुईमूग पिकाला कोंब तसेच नाचणी पीकही पुर्णत: आडवे झाले आहे.याबाबत कृषी विभागाकडून नुकसानीचा अहवाल घेऊन शासनाकडे पाठवावा. तसेच प्रतीगुंठा १०० रुपये तुटपुंजी नुकसान भरपाई किमान प्रतीगुंठा ५०० रुपये करण्यात यावी. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा लाभापासुन अनेक लाभार्थी वंचित आहेत, तो लाभही तात्काळ देण्यात यावा.गेल्या वर्षी नुकसान भरपाईसाठी लागणाऱ्या ७ – १२ स शासनाकडून पैसे घेतले जात नव्हते.परंतु आता सातबारासाठी शासन पैसे घेत आहे ते शासनाने बंद करावे.या गोष्टींचा शासनाने सहानभुतीपुर्वक विचार करावा व केवळ घोषणा न करता ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांना थेट मदत करावी अन्यथा शासनाविरोधात शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक धर्मराज कांबळी,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष यशवंत उर्फ बापु पंडित,महिला तालुका अध्यक्षा -माजी उपसभापती स्मिता दामले,जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक, बाळा सावंत,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर ,ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, अनु. मोर्चा तालुकाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय ठाकुर, शक्ती केंद्र प्रमुख नाथा मडवळ व ज्ञानेश्वर केळजी व तात्या कोंडसकर , किसान मोर्चा उपाध्यक्ष मकरंद प्रभु , किसान मोर्चा सरचिटणीस सत्यवान पालव , किसान मोर्चा चिटनीस अपर्णा बोवलेकर , रामचंद्र गावडे , प्रकाश बांदवलकर, विनय गोरे , शांताराम तेली, दशरथ गडेकर, संदीप खोत,भुषण बांबार्डेकर आदी किसान मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.