मालवण /-
देश स्तरावर वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट (NEET) परिक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकासह देशात १९ क्रमांक प्राप्त आशिष अविनाश झांटये या मालवणच्या सुपुत्राचे यश आम्हा सिंधुदुर्ग वासीयांसाठीही अभिमानास्पद आहे. अशी कौतुकाची थाप देत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस यांच्या वतीने आशिष याचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, दिल्ली एम्स मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशाचे धेय्य घेऊन आशिष यांने मिळवलेले यश विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत असेच आहे. आतापर्यंत मिळवलेल्या यशात गुरुजन व आई-वडील यांचा सिंहाचा वाटा आहे. वैद्यकीय क्षेत्रात आपण धेय्य निश्चित केले आहे. त्यातही आपण यश संपादन कराल. असे कौतुकोद्गार भोसले, डांटस यांनी
आशिष याच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस यांच्यासह राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, शहर अध्यक्ष आगोस्तिन डिसोझा, बाबू डायस, किरण रावले, यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे दीपक चव्हाण, देवानंद लोकेगावकर, विश्वनाथ डोर्लेकर, सुरज गवंडी, वसंत हडकर, सतीश ढोलम, स्वप्नील केळुसकर, संजय लुडबे, सुरेश वरक, संतोष गावकर, महेंद्र गावडे आदीसह आशिष याचे वडील डॉ. अविनाश झांटये व आई डॉ. शिल्पा झांटये उपस्थित होते.