वेंगुर्ला /-
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्ले संघटनेच्या वतीने तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नेहमी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सध्या ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ आहे. ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिक्षक व विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिनानिमित्त १५ ऑक्टोबर रोजी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे.
भारत रत्न डाॅ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजूषा असेल.या स्पर्धेत फक्त वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.विद्यार्थी व शिक्षकांसाठी भिन्न अर्थात स्वतंत्र प्रश्नसंच लिंक्स असतील.विद्यार्थी गटात १ली ते ७वी असा एकच गट असेल.15 ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता तालुक्यातील शिक्षकांच्या व्हाट्सअप्प गृपवर प्रश्नांच्या लिंक्स शेअर करण्यात येतील.१५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजेपर्यंत सहभागी झालेल्या स्पर्धांकांचाच स्पर्धेसाठी विचार केला जाईल.प्रथम पाच क्रमांक प्राप्त गुणवंत स्पर्धकांना त्याच दिवशी ई प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच त्यांना मार्गदर्शन करणा-या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्लेचे अध्यक्ष एकनाथ जानकर व सचिव सागर कानजी यांनी केले आहे.