वेंगुर्ला /-
महाविकास आघाडी सरकारच्या काळात संपुर्ण महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार , अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरुच आहेत.त्यातच कोरोना महामारीसारख्या अति संवेदनशील काळातही कोवीड सेंटर व हाॅस्पीटल मध्ये महिलांवरील अत्याचार व विनयभंग होण्याचे प्रमाण वाढलेले आहेत, परंतु शासनाकडून याबाबत कोणतीही गांभीर्याने कारवाई होताना दिसत नाही.यावरून हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत कीती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते.अशा या महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी तसेच उमेद अभियान अंतर्गत अन्याय झालेल्या महिला भगिनींना पाठींबा देण्यासाठी भाजपा महिला मोर्चा च्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा चिटनीस ऍड. सुषमा खानोलकर ,महिला जिल्हा सरचिटणीस सारीका काळसेकर, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, जिल्हा चिटनीस नगरसेविका पुनम जाधव, कृपा मोंडकर, श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर,वेतोरे सरपंचा राधिका गावडे , वेतोरे उपसरपंच कोमल नाईक, ग्रा. पं. सदस्य यशश्री नाईक,राधा सावंत , हसीना बेन मकानदार, शांती केळुसकर तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर , तालुका उपाध्यक्ष संतोष गावडे, नगरसेवक धर्मराज कांबळी, सोमनाथ टोमके , रमेश नार्वेकर, गणेश गावडे , बाळु प्रभु, नितीश कुडतरकर,शरद मेस्त्री , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, बुथप्रमुख अर्जुन तांडेल, दिगंबर जगताप आदी उपस्थित होते.