✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ कविलकाटे येथील जेष्ठ शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते श्री. रमेश विनायक हरमलकर यांची शिवसेना कुडाळ तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसे नियुक्ती केल्याचे पत्र शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी आज कुडाळ शिवसेना पक्ष कार्यालयात श्री.रमेश हरमलकर यांना दिले.हरमलकर यांची निवड,वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय श्री.एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या कुडाळ तालुकासंघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे.अश्याप्रकारे नियुक्ती करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित शिवसेना कुडाळ तालुका संघटक श्री.रमेश विनायक हरमलकर यांनी मीडिया शी बोलताना असे सांगितले की,मी.जुना .बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.मला चांगलेच माहित आहे शिवसेना पक्ष वाढीसाठी काय,काय,,करावे लागते.शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्व पदाधिकारी यांना घेऊन तालुक्यातील अनेक पक्ष प्रवेश आपण लवकरच घेणार आहोत,असे हरमलकर यांनी पद मिळाल्या नंतर कुडाळ शिवसेना पक्ष कार्यालयात मिडिया शी बोलताना सांगितले.

रमेश हरमलकर यांना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देते वेळी शिवसेना कार्यालयात,शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर ,शिवसेना तालुका प्रमुख योगेश तुळसकर ,शिवसेना तालुका प्रमुख अरविंद करलकर,शिवसेना जिल्हा समन्वयक ऍड.श्री.यशवर्धन राणे ,पावशी शिवसेना विभाग प्रमुख जयदीप तुळसकर,समील जळवी,धर्मा सावंत अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page