देवगड /-
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजातील लोकानी पुढे यावे मी त्यांच्या अध्यक्ष या नात्याने ठामपणे पाठिशी असेन.समाजबांधवानी हेवेदावे न ठेवता एकजूट दाखविली पाहिजे कि जेणेकरून दुसरा कुठलाही समाज आपल्याला मागे खेचणार नाही. मागासवर्गीयाना मिळणाऱ्या आरक्षणा मुळे दुसरा समाज आपल्याला आरक्षणा पासुन दुर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.परंतु समाजबांधवानी एकत्र येवून त्याना आपली एकजूट दाखवावी असे मत सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यानी व्यक्त केले. देवगड येथील तालुक्यातील समाजमंडळाच्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा देवगडची सर्वसाधारण सभा जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव यांचे अध्यक्षतेखाली स्वामी समर्थ मंगल कार्यालय देवगड जामसंडे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यकारीणी निवडप्रक्रीया करून अध्यक्ष पदासाठी रमेश चव्हाण तर उपाध्यक्ष पदी प्रभाकर दहिबांवकर व प्रमोद चव्हाण, सचिव भागवत बुथकर, सहसचिव विश्वास मुणगेकर व शंकर समजीसकर, कोषाध्यक्ष दिपक समजीसकर यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा कार्यकारी मंडळासाठी प्रशांत मिठबांवकर,व विश्वनाथ शिरकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर माणगावकर नुतन तालुका अध्यक्ष रमेश चव्हाण, मालवण तालुका अध्यक्ष सुनील पाताडे,यशवंत देवरूखकर,तुकाराम देवरूखकर, माजी तालुका अध्यक्ष गणपत केळकर, प्रशांत मोडकर सुरेश जाधव ,अनिल पवार, सौ रेश्मा चव्हाण, विजय जाधव ,बबण देवरूखकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना चंद्रसेन पाताडे यानी सांगितले की, देवगड तालुका कार्यकारीणी जानेवारी २०१९ मध्ये तात्कालिन जिल्हा अध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर यानी निवडप्रक्रीया चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्याकार्यकारीणी बाबत तक्रारी दाखल झाल्या होत्या. सदर कार्यकारीणी बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सभा घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे कार्यरत कार्यकारीणीची सभा घेऊन कार्यकारीणी बरखास्त करण्यात येऊन नवीन कार्यकारी मंडळ निवडण्यासाठी.जिल्हाच्यावतीने सभा बोलविण्यात आल्याचे श्री पाताडे यानी सांगितले.
यावेळी नुतन अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी समाजबांधवाना विश्वासात घेऊन काम करण्याचे आश्वासन दिले. सभेचे सुत्र संचालन जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यानी तर उपस्थिताचे आभार जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर माणगावकर यानी मानले.