मालवण तालुक्यातील काही तरुणांचा मनसेत प्रवेश

मालवण तालुक्यातील काही तरुणांचा मनसेत प्रवेश

राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले सर्वांचे स्वागत..

मालवण /-

मनसेने तालुक्यात पक्षप्रवेशाचा धडाका कायम ठेवला असून काल येथे मनसेच्या बैठकीत मालवणातील काही युवकांनी मनसे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. या बैठकीत तालुक्यात मनसे पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध विभागातील मनसे व मनविसे मधील पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
मालवण भरड येथील लीलांजली हॉल मध्ये मालवण तालुका मनसेची बैठक राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी वायरी बांध येथील दत्तराज चव्हाण, सिद्धेश मयेकर, मालवणातील हर्षल तोरसकर, तन्मय बिळवसकर, राजदीप आरोंदेकर, गौरव कांबळे, अक्षय कांदळकर, रंजन दळवी, चौके येथील राजेश परब यांनी मनसेत प्रवेश केला.

यावेळी मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर अध्यक्षा भारती वाघ, उपतालुका अध्यक्षा राधीका गावडे, मनविसे तालुका अध्यक्ष विनायक गावडे, उपतालुका अध्यक्ष उदय गावडे, भुषण गावडे, सचिन गावडे विशाल ओटवणेकर, हरी खवणेकर, संकेत वाईरकर, विशाल माडये, अमित राजापूरकर, नंदकिशोर गावडे, संतोष सावंत, प्रणव उपरकर आदी उपस्थित होते.

तालुक्यातील मनसेच्या विविध पदांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये उदय गावडे – उपतालुकाध्यक्ष -पेंडूर पोईप विभाग, बजरंग कुबल – तारकर्ली विभाग अध्यक्ष, प्रसाद बापार्डेकर – तारकर्ली शाखा अध्यक्ष, विशाल निकम – सर्जेकोट उपविभाग अध्यक्ष, वैभव आजगावकर – सर्जेकोट शाखा अध्यक्ष, मनोहर केळुसकर – देवबाग शाखा अध्यक्ष, अमेय सुर्वे – हडी उपविभाग अध्यक्ष, हरी खवणेकर – पोईप उपविभाग अध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील विविध पदांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. यामध्ये संकेत वाईरकर – उपतालुकाध्यक्ष मालवण, साईराज चव्हाण – मालवण शहर अध्यक्ष, आशिष घाडीगांवकर – उपतालुकाध्यक्ष, गणेश कांदळगावकर – सर्जेकोट विभाग अध्यक्ष, प्रतिक कुबल – तारकर्ली-देवबाग विभाग अध्यक्ष).यावेळी परशुराम उपरकर यांनी प्रवेशकर्ते युवकांचे पक्षात स्वागत केले तसेच नियुक्ती झालेल्या नूतन पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

अभिप्राय द्या..