मुंबई /-
मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघड केला असून तपासाला सुरुवात झाली आहे. यादरम्यान एका साक्षीदाराने एनडीटीव्हीशी बोलताना काही ठराविक चॅनेल पाहण्यासाठी आपल्याला दर महिन्याला पैसे मिळत होते असा खुलासा केला आहे.
या व्यक्तीच्या घऱात टीआरपी मोजण्यासाठी मीटर बसवण्यात आलं होतं. तीन साक्षादारांपैकी एक असणाऱ्या या व्यक्तीने आपल्या घरात मीटर लावण्यात आल्यानंतर बिलाची काळजी घेतली जाईल, याशिवाय डीटीएचचा रिचार्जही केला जाईल असं सांगितलं असल्याचा खुलासा केला आहे.
“बॅरोमिटरच्या एका अधिकाऱ्याने मला बॉक्स सिनेमा पाहण्यास सांगितलं होतं. रोज दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत चॅनेल पाहण्यासाठी मला सांगण्यात आलं होतं.
यासाठी ५०० रुपये मिळतील असं त्याने म्हटलं होतं,” अशी माहिती साक्षीदाराने दिली आहे. “आपण दोन ते तीन वर्ष हे काम करत होतो, पण हा टीआरपी घोटाळा असेल याची अजिबात कल्पना नव्हती,” असं त्याने म्हटलं आहे.