वेंगुर्ला /-

वेंगुर्ले नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून केलेल्या वॉटर एटीएम व हरित पट्टे साठी वृक्ष लावगड या कामात मोठा अपहार झाला असून या दोन्ही कामांची पालकमंत्री उदय सामंत यांनी चौकशी करावी यात दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा व दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संदेश निकम यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.तसेच याबाबत पालकमंत्र्यांच्या सोमवारी ओरोस येथे होणाऱ्या जनता दरबारात हा विषय मांडण्यात येणार असल्याची माहिती संदेश निकम यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.यात मोठा अपहार झाला असल्याचे आरोप श्री. निकम यानी केला आहे.

वेंगुर्ले शहरात ६ ऑक्टोबर रोजी वाटर एटीएम उद्घाटन झाल्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ले नगरपरिषद कार्यालयासमोरील वाटर एटीएम मधून पाण्यात नागरिकांना अळ्या आढळल्या नागरिक व व्यापाऱ्यांनी नगर परिषद प्रशासनाला लावून ती गोष्ट उघडकीस आणली.त्यानुसार तात्काळ नगर परिषद कार्यालयासमोरील वॉटर एटीएम प्रशासनाने बंद केले

•हरितपट्टा वृक्ष लागवडीत अपहार!

सन २०१८ ते २०२० या कालावधीत तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी शासनाकडे प्रयत्न करून शहरात हरित पट्यात ४५ ते ५० लाख रुपयांचा निधी मिळविला. तत्कालीन मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या कालावधीत झाली. मात्र, कोठे किती झाडे लावली, याची माहिती त्यांनी नगरसेवकांना किंवा समागृहाला दिली नाही.सुमारे ३ हजार झाडे लावून ४० ते ४५ लाख रुपयांचे बिल अदा केले आहे. यातही मोठा अपहार झाला आहे,असा आरोप करण्यात आला.संदेश निकम यांनी सांगितले की सदर हरित पट्ट्यासाठी झाडांची लागवड ही आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ले शहरातील नागरिक व पर्यटकांना शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वॉटर एटीएम सुरू करण्यासाठी ४० लाखांचा निधी वेंगुर्ले नगर परिषदेस मिळवून दिला.

त्यानुसार वेंगुर्ले शहरात ०५ ठिकाणी वॉटर एटीएमसाठी जागा निश्चित करण्यात आल्या.शासनाच्या नियमानुसार शासकीय कामे करताना ती जागा शासनाच्या नावे करून घेण्याचा नियम असताना केवळ करारपत्र संबंधित जागा मालकांकडून करून घेण्यात आले आहे.ही वॉटर एटीएम’ जिल्ह्यातील एका इंडस्ट्रिजमार्फत करुन घेण्यात आली.मात्र, ती लेखी स्वरुपात इंडस्ट्रिजने नगर परिषदेकडे सुपुर्द केली नाही.

या एटीएमचे घाईगडबडीत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी उद्घाटन केले. या एका वॉटर एटीएमची बाजारभावाची किंमत दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंत असून त्यासाठी नगर परिषदेने सुमारे आठ लाख खर्ची केले आहे.

पालिकेची मनमानी!

शासन एकीकडे म्हणते ‘झाडे लावा झाडे जगवा. पण वेंगुर्ले नगर परिषद कॅम्प परिसरातील मोठी झाडे तोडत आहेत. त्या ठिकाणी नवीन झाडांची लागवड करीत नाही.ही झाडे तोडताना निविदा काढली जात नाही.मनमानी करून न. प वृक्ष समितीला झाडे तोडण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नसल्याने याचीही चौकशी शासनाने करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page