✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांच्या कलमठ विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव काशीकलेश्वर मंदिर येथे करण्यात आला.माजी जि. प. सदस्या स्वरुपा विखाळे, उद्योजक रामदास विखाळे, शिवसेना उबाठा गटाचे कलमठ विभागप्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर,युवा सेनेचे कलमठ शहरप्रमुख तथा ग्रा. पं. धीरज मेस्त्री, ग्रा. पं. सदस्य सचिन खोचरे, ग्रा. पं. सदस्या प्रियाली आचरेकर, योगिता चव्हाण, माजी ग्रा. पं. सदस्य राजू राठोड, वैदेही गुडेकर, विलास गुडेकर, किरण हुन्नरे, बाबू कोरगावकर, नंदकिशोर कोरगावकर, बचू कांबळे, परेश आचरेकर, अनंत कदम आदी उपस्थित होते. विनायक राऊत हे पुन्हा विक्रमी मताधिक्यांनी निवडून येऊ दे, असे गाऱ्हाणे श्री देव काशीकलेश्वर चरणी शिवसैनिकांनी घातले. ‘शिवसेनेचा विजय असो’, ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धव ठाकरे तुम्ह आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘विनायक राऊत तुम्ह आगे बढो हम तुम्हारे साथ है’, अशी घोषणाबाजी
करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page