✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसघाचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यानी आज शेवटच्या दिवशी शुक्रवारी 19 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, किरण सामंत यांची उपस्थिती होती. मोठे शक्तीप्रदर्शन करत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय भव्य रॅली काढण्यात आली.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शेकडो पदाधिकारी आणि हजारो च्या संख्येने कार्यकर्ते या रॅलित सहभागी झाले होते.यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, अब की बार 400 पार, नारायण राणें साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. या रॅलिचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सभेत रुपांतर करुन झाला. रॅलित गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, शेखर निकम, निलेश राणे, बाळ माने, प्रमोद जठार, राजन तेली, दीपक पटवर्धन, प्रभाकर सावंत, संजय आग्रे अबिद नाईक अजित गोगटे, आदींसह भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page