✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

माणसाची बदलती जीवनशैली, शहरीकरण, प्रदूषण या व अशा अनेक कारणांमुळे दिवसेंदिवस शहरी व ग्रामीण भागात श्वसनविकारांचं प्रमाण वाढत आहे. दमा (अस्थमा), सीओपीडी, इंटरस्टिशिअल लंग डिसिज, लंग कॅन्सर, अॅलर्जी या फुफ्फुसविकारांमध्ये प्रामुख्याने वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामानाने क्षयरोगाचं प्रमाण काही अंशी कमी होत आहे. लहान मुलांमध्येही अॅलर्जी व दम्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा वाढलेलं आढळून येत आहे. वाढत्या आयुर्मानामुळे वयोवृद्ध व्यक्तिंमध्ये डायबेटिस, हृदयविकार, संधिवात या आजारांसोबतच उतारवयातील दमा (सीओपीडी) प्रामुख्याने बघायला मिळतो.

कोविडमहामारी नंतर फुफ्फुसांच्या विषाणूजन्य संसर्गामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर श्वसनविकारांविषयी माहिती, निदान व उपचारांच्या आधुनिक पद्धती याबद्दल जिल्ह्यातील डॉक्टर्सचे ज्ञान अद्ययावत व्हावे याकरिता, डी.एफ.सी सिंधुदुर्ग, वर्किंग कमिटी कुडाळ यांच्यावतीने एक दिवसाची वैद्यकीय परिषद व कार्यशाळा Sindhu RespiCon (सिंधुरेस्पिकॉन) दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. याकरिता मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, गोवा येथील नामवंत फुफ्फुसविकार तज्ज्ञ तसेच संशोधक मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. आराध्या अडोरर, झाराप झिरो पॉइंट याठिकाणी ही वैद्यक परिषद संपन्न होत आहे.

यामध्ये विविध विषयांवर चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आयुर्वेद व होमिओपॅथिक व्याख्यानांसोबतच, अस्थमा, सीओपीडी, लहान मुलांमधील दमा, हायपरसेंसिटीव्हीटी न्युमोनायटीस, क्रॉनिक कफ, एअर पोलूशन, फुफ्फुसाचे संसर्ग याविषयांवर डॉक्टरांकरिता मार्गदर्शन होणार आहे. सोबतच इनहेलर्स व व्हेंटिलेटर्स या विषयांवर कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फुफ्फुसविकार विशेषज्ञ, डॉ. सुंदिप साळवी (पुणे), डॉ. प्रल्हाद प्रभूदेसाई (मुंबई), डॉ. नितीन अभ्यंकर (पुणे), डॉ. अनिल मडके (सांगली), डॉ. मोहन पोतदार (इचलकरंजी- कोल्हापूर), डॉ. प्रवीण भट (गोवा), डॉ. अजित कुलकर्णी (कोल्हापूर), डॉ. नीलेश कोरडे (गोवा), डॉ. जगदीश ढेकणे (पुणे), डॉ. हिमांशू पोफळे (पुणे), डॉ. स्नेहल गोवेकर (सिंधुदुर्ग) या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.

ही Sindhu RespiCon यशस्वी करण्याकरता डॉ. संजीव आकेरकर, डॉ. प्रशांत कोलते, डॉ. जी. टी. राणे, डॉ. संतोष जाधव, डॉ. गिरीश बोर्डवेकर, डॉ. वैभव आईर, डॉ. मिलिंद बोर्डवेकर, डॉ. गौरी परुळेकर यांनी विशेष मेहनत घेतली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. संजय केसरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच डि.एफ.सी गव्र्व्हनिंग कौन्सिल व कुडाळ मेडिकल असोसिएशन (केएमए) डॉक्टर्सचे विशेष मार्गदर्शन व सहभाग लाभला आहे.

जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील जवळपास पाचशे डॉक्टर्सचा या परिषदेमध्ये सहभाग असणार आहे. या व अशाप्रकारच्या वैद्यकीय परिषदांचा जिल्ह्यातील डॉक्टर्सना उत्तम रुग्णसेवा देण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page