मालवण /-
जिल्ह्यात covid-19 चा कम्युनिटी स्प्रेड म्हणजेच सामाजिक प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे .जिल्हा प्रशासनाकडून प्रसारित केलेल्या कोरोणा अपडेट चा विचार करता यावेळी दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी होणारा अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनीकरित्या होणारे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात यावेत . बौद्ध बांधवांनी धम्मचक्र प्रवर्तन अशोक विजया दशमीचे कार्यक्रम आपापल्या घरी साजरे करावे . स्थानिक गाव पातळीवर विहारात कार्यक्रम आयोजित केल्यास प्रशासनाने दिलेल्या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी.फिजिकल डिस्टन्सिंग ,मास्क , या बाबतीत नियम पाळावे.
वेगवेगळ्या गावातील लोकांनी एकावेळी एकत्र येऊ नये.आपण महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, बुद्ध जयंती या सारखे उत्सव साजरे करताना राज्य व जिल्हा शाखेने दिलेल्या आदेशाचे पालन केले आहे.यावेळीही भावनांना आवर घालून समाजाचे स्वास्थ्य जपण्याला प्राधान्य देऊया असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्गचे अध्यक्ष विश्वनाथ कदम आणि सरचिटणीस
भाऊ कासार्डैकर यांनी केले आहे