सावंतवाडी /-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उद्योग-व्यापार विभाग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी सिंधुदुर्गातील व्यापाऱ्यांच्या समस्यांचे दिले निवेदन.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री मा.जयंतराव पाटील , तसेच खासदार सन्माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याच्या उद्योग व व्यापार विभागाची तातडीची सभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आली होती या या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी यांना कोणकोणत्या समस्या भेडसावतात या पुंडलिक दळवी यांनी निर्शनास आणून दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.धनराज फुसे साहेब उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील उद्योग धंदे या बाबत तसेच कोरोनाच्या संकटातील व्यापाऱ्यांच्या समस्या बाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातील समस्यांबाबत,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील, लोकसभेचे खासदार सौ सुप्रिया ताई सुळे यांना निवेदन देऊन व्यापाऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या.
या समस्यांचे शासनामार्फत लवकरात लवकर योग्य तो निर्णय उपायोजना करून घेऊ असे आश्वासनही दिले. या सभेसाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून सिंधुदुर्ग मधून उद्योग व व्यापार विभागातर्फे, उद्योग व्यापार विभाग जिल्हाध्यक्ष श्री. पुंडलिक दळवी, उद्योग व व्यापार जिल्हा कार्याध्यक्ष श्री हिदायतुल्ला खान, तसेच उद्योग व्यापार महिला जिल्हाध्यक्ष सौ. दर्शना बाबर देसाई हे उपस्थित होत्या.