✍🏼लोकसंवाद /- कुडाळ,अमिता मठकर.
पणदूर ग्रामपंचायत व पशु वैद्यकीय दवाखाना पणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांना होणाऱ्या लंपी आजाराबाबत गावातील जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सरपंच पल्लवी पणदूरकर व उपसरपंच साबाजी मस्के यांच्या उपस्थितीत व डॉ.अमोल मेस्त्री, डॉ.दीपक सकपाळकर, डॉ.प्रज्वल खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेश टंगसाळी, शेतकरी भागेश तेली, नामदेव केरकर, राकेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य आबा सावंत, ऐश्वर्या टंगसाळी, किशोरी जाधव, संगीता साईल, अपर्णा साईल, उल्हास पणदूरकर उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे विद्यार्थी आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पणदूर गावातील लसीकरण मोहीम सावंतवाडा येथून सुरू करण्यात आली. अनुक्रमे जितवणे,सिद्धार्थ नगर, साईलवाडा, सिद्धवाडी, मयेकरवाडी अशी राबविण्यात आली. जवळपास 100 ते 150 जनावरांना लसीकरण तसेच लंपी आजारा संदर्भात शेतकऱ्यांना उपायोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
