✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

पावशी येथे कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.तर त्यांच्यासोबत असलेला अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास पावशी ग्रामपंचायत समोरील मुंबई – गोवा महामार्गावर घडली. अरुण घारे (रा. पावशी) असे मृताचे नाव आहे.तर दत्ताराम पावसकर असे जखमीचे नाव आहे.जखमी दत्ताराम पावसकर यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.तर त्यांच्या तावडीने उपचार करून गोवा येथील व्हिजन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या अपघात झाल्याची माहिती मिळतात त्या ठिकाणी पोलीस व ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमीला सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page