✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी.
करूळ घाटात पुन्हा खोल दरीत ट्रक कोसळून अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक चालकाने उडी मारल्याने तो बालबाल बचावला आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.शनिवारी वाळूने भरलेल्या डंपरला अपघात होऊन चालक ठार झाला होता. काही तासातच आज करूळ घाटात दुसरा अपघात झाला.कोल्हापूरहून सावंतवाडीकडे जाणारा लोखंडी शिगा भरलेला ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात ट्रक खोल दरीत कोसळला आहे.प्रसंगावधान राखत चालकाने उडी मारल्याने तो बालबाल बचावला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
