✍🏼लोकसंवाद /-कुडाळ,अमिता मठकर.

कुडाळ शहरातील सामजिक कार्यकर्ते विजय कांबळी यांनी १५ ऑगस्ट रोजी कुडाळ नगरपंचायत च्या विरोधात कुडाळ नगरपंचायत समोर उपोषणास करण्याचा ईशारा दिला होता.या उपोषणाची पुर्वकल्पना कुडाळ नगरपंचायातला आगाऊ लेखी निवेदन देत दिली होती.आणि आज १५ ऑगस्ट २०२३ रोजी नगरपंचायत कार्यालय कुडाळ येथे संकाळी ८ वाजल्या पासून उपोषण करण्यात विजय कांबळी आणि त्यांचे साथीदार यांनी सुरुवात केली होती.हे उपोषण पाण्या संदरभातील असल्याने ते उपोषण स्थळी ग्रामस्थ आपल्या मागण्यांनवर ठाम होते.याच दरम्यान कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी विजय वेंगुर्लेकर आणि ग्रामस्थ यांना लेखी निवेदन देत येत्या महिन्यात ७/५० प्रति युनिट दराने पाणी बिल ठराव रुपी लेखी पत्र दिल्यामुळे विजय वेंगुर्लेकर आणि वेंगुर्लेकर वाडीतील ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.

सामाजिक कार्यकर्ते विजय कांबळी यांना उपोषण करण्यास पाठिंबा देण्यास ग्रामस्थ विलास पावसकर,वैभव पाटकर,कपील पावसकर,प्रमोद वेंगुर्लेकर ,निलेश साळगावकर ,हेमचन्द्र तुळसकर ,महेश साळगावकर ,विजय आंनद वेंगुर्लेकर ,विनेश तिरवडेकर
शैलेश पाटकर ,अंकुश शिरोडकर ,ऊमेश दाभोलकर ,विजय चन्द्रकांत वेंगुर्लेकर ,गजानन बाबली वेंगुर्लेकर , बंड्या सांवत ,अदिति सांवत ,अरुण गिरकर ,विजय पावसकर ,अनिल पाटकर ,चन्द्कांत म्हापणकर ,गुरु देसाई ,प्रज्ञा प्र राणे
,राजु बक्षी ,बाबु सांवत ,उन्मेशा दाभोलकर ,रेश्मा जळवी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page