✍🏼लोकसंवाद /- कुडाळ,अमिता मठकर.
कुडाळ येथे सोमवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी मिल्लत क्लब, कुडाळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने ‘रक्तदान’ शिबीर संपन्न झाले.भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर कुडाळ येथे,आज मिल्लत क्लब, कुडाळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने ‘रक्तदान’ शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबीर सिद्धिविनायक हॉल येथे सकाळी ९ ते १.३० या वेळेत अतीशय ऊत्साहात संपन्न झाले. या रक्तदान’ शिबीरात ७२ रक्तदात्यानी रक्तदान करून हे शिबीर यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल आयोजकांनी सर्व रक्दात्यांचे आभार मानले.
कुडाळ येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन कुडाळ नगर पंचायत चे माजी नगरसेवक आणि रक्तदातेे श्री. एजाज नाईक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे श्री. तेंडोलकर, श्री.किशोर नाचणोलकर, जयभीम युवक मंडळ, कुडाळ चे अध्यक्ष श्री. विद्याधर कुडाळकर, भुषण कुडाळकर, मिल्लत क्लब चे आदील शहा, नियाझ शहा, हाफीज झेैद, सज्जाद शेख, इरफान मणीयार, इरफान करोल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सिंधुदूर्ग जिल्हा रक्तपेढी चे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचा यांचा सन्मानचिन्ह देउन सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमास कुडाळ तहसीलदार माननीय श्री. अमोल पाठक, पोलीस निरीक्षक सौ. वृणाल मुल्ला मॅडम आणि मा.नगराध्यक्षा सौ. अक्षता खटावकर यांनी सदिच्छा भेट दिली आणि उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या.जयभीम युवक मंडळाचे पदाधिकारी श्री. विद्याधर कुडाळकर आणि सहकाऱ्यांनी शिबिरास भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.
या रक्तदान शिबिरात एकूण ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
जिल्हा रक्तपेढी द्वारे सन्मान चिन्ह देऊन मिल्लत क्लब, कुडाळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान च्या उपक्रमास शुभेच्छा देण्यात आल्या. हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री. हाफीज झैद, श्री. मुबीन दोस्ती, श्री. फारूक दोस्ती, श्री. इरफान करोल, श्री. अय्याज दोस्ती, श्री. रिझवान मणियार, नियाज शहा, श्री. जफर जमादार, आदींचे सहकार्य लाभले.यापुढे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन सातत्याने केले जाणार असुन रक्तदान चळवळी द्वारे राखीव रक्तदाता गट देखील तयार केला जात आहे, अशी माहिती माजी नगरसेवक श्री. एजाज नाईक यांनी दिली.
