▪️अग्नीशामक बंम्ब येण्यास उशीर झाल्याने ग्रामस्थांनीची नाराजी..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
कुडाळ शहरातील सिद्धिविनायक अपार्टमेंट या इमारतीमध्ये गिझरमध्ये झालेल्या बिघाडामुळे आग लागली. इमारतीमधील रहिवाशांनी कुडाळ एम. आय. डी.सी. येथील अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझवण्यात यश आले.अग्नीशामक बंम्ब येण्यास उशीर झाल्याने ग्रामस्थांनीची नाराजी वेक्त केली आहे.
कुडाळ सिद्धिविनायक अपार्टमेंट या इमारतीमध्ये राहणाऱ्या मदिना शाबुद्दीन बागवान यांच्या फ्लॅटमध्ये गिझर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याकारणाने आग लागली.अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करताच त्यांनी लागलीच ही आग विजवली आणि सिलेंडर, शेगडी असे ज्वलनशील पदार्थ ताबडतोब घराबाहेर नेऊन ठेवले.त्यामुळे संभाव्य धोका टळला.परंतु या आगीमुळे फ्लॅटचे आणि फ्लॅट मधील सामानाचे किरकोळ नुकसान झाले आहे.
