✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
कलमठ गावडेवाडी येथील जेष्ठ नागरीक तसेच कणकवली बाजारपेठेतील पान सुपारी, तंबाखु, नारळाचे व्यापारी, पंढरीनाथ लक्ष्मण मसुरकर (वय 70) यांचे आज सकाळी ह्रदयविकाराने निधन झाले.ते पंडीत या टोपन नावाने परिचित होते. काही वर्षापुर्वी ते ग्रामपंचायत सदस्यही होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
