✍🏼लोकसंवाद /-अमिता मठकर,कुडाळ.

कणकवली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मान.सचिन हुंदवळेकर ह्यांनी नुकतीच जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमास सदिच्छा भेट दिली. सोबत त्यांनी यावेळी नारळाची रोपे संवीता आश्रम संस्थापक संदिप परब यांच्या कडे सुपुर्द केली. ह्यावेळी सोबत त्यांचे सहकारी उपस्थीत होते. जीवन आनंद संस्था दरवर्षी संस्थेतील बांधव + भगीणी, कार्यकर्ते आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाने हजारो रोपांचे वृक्षारोपण करून, सार्वजनिक स्थळी स्वच्छता मोहिमांचे आयोजन करून पर्यावरण संवर्धनाचे कार्य केले जाते. या पार्श्वभूमिवर बोलताना जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सचिव संदिप परब यांनी कणकवली पोलिस अधिकारींकडून प्राप्त झालेल्या नारळ रोपांचे मोठे महत्व असल्याचे सांगून समाजातील प्रत्येक व्यक्तीने वसुंधरेच्या संरक्षणासाठी आपापल्या परिने काम केले पाहिजे अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. संदिप परब यांनी पोलीस गणवेशातील ह्या पोलिस अधिकारींचे आश्रमात सहर्ष स्वागत केले. व आश्रमास भेट दिल्याबद्दल तसेच नारळ रोपांसाठी त्यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page