स्पर्धेच्या विजेत्या संघाला 50 हजार तर उपविजेत्या संघाला 25 हजाराचे बक्षीस..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

येथिल भाजपाचे युवा नेते संदिप गावडे यांच्या माध्यमातून सावंतवाडीत महाराष्ट्र आणी गोव्यातील खेळाडुंसाठी राज्यस्तरीय मान्सुन चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
या स्पर्धेच्या विजेत्या संघाला 50 हजार तर उपविजेत्या संघाला पंचविस हजाराचे बक्षीस देण्यात येेणार आहे अशी माहीती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत संदिप गावडे मित्रमंडळा च्या वतीने अनिकेत आसोलकर यांनी दिली

ही स्पर्धा ता 15 ला येथिल जिखमाना मैदानावर खेळविली जाणार आहे यात उत्कृष्ठ खेळाडूू,उत्कृष्ठ कीपर,उत्कृष्ठ डी•फेन्स व उत्कृष्ठ गोल अशी प्रत्येकी पाच हजाराची पारीतोषीक देण्यात येणार आहे श्री गावडे यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला या औचित्याने महाराष्ट्रासह गोव्यातील कलाकारांना व्यासपिठ मिळावे यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमिवर मंडळाच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आज या ठीकाणी पत्रकार परिषद आयोजित करुन ही माहीती देण्यात आली यावेळी उपाध्यक्ष चैतन्य सावंत,हेमंत पांगम अभिषेक लाखे,कीसन धोत्रे,शुभम कांबळे आदी सदस्य उपस्थित होते .

यावेळी श्री आसोलकर म्हणाले महाराष्ट्रासह गोव्यातील खेळाडुंच्या अंगात असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी क्रीकेटच्या पलिकडे जावून आमच्या मंडळाकडून काही तरी वेगळे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्या पाश्वर्र्भूमिवर ही स्पर्धा भरविण्यात आली आहे
ही स्पर्धा एक दिवशीय असेल संघ वाढल्यास कींवा काही अडचण आल्यास दोन दिवस ही स्पर्धा खेळविली जाईल प्रथम संपर्क करणार्‍या 25 संघाना या स्पर्धेत सहभागी करुन घेतले जाणार आहे तर यासाठी नियमीत खेळाचे नियम ठरविण्यात आले आहेत ज्या स्पर्धकांना या टिमना या खेळात सहभागी व्हायचे त्यांनी 9422908853 आणी 9421437033 या नंबरशी संपर्क साधावा असे आवाहन मित्रमंडळाच्या पदाधिकार्‍यांकडुन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page