✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
कुडाळ शहरातील सामजिक कार्यकर्ते विजय कांबळी हे १५ ऑगस्ट रोजी कुडाळ नगरपंचायत च्या विरोधात उपोषणास बसणार आहेत.हे उपोषण पण्यासंदर्भातील असून यात गवळदेव वाडी, वेंगुर्लेकर वाडी यांचा समावेश आहे.कुडाळ येथील M I D C नळ कनेक्शन धारक हे गेली सहा वर्षे नगर पंचायतीतिने वाढीव बीला संदर्भात अनेक वेळा आवाज उठवुन सुध्दा व ऊपोषणाची नोटीस देऊन सुद्धा आमच पाणि बिल कमी केलेल नाही या ऊलट आम्हाला खोटी आश्वासन देऊन आम्हाला ऊपोषण करण्यापासुन वंचीत केल जात आहे.याच करिता सामजिक कार्यकर्ते विजय वेंगुर्लेकर हे या 15 ऑगस्ट २०२३ रोजी पाणी वाढीव बीला संदर्भात कुडाळ नगर पंचायत विरोधात उपोषण करणार आहे.असे विजय कांबळी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्यांच्यासोबत वाडीतील श्री विलास पावसकर यांच्या नेतृत्वाखाली नगर पंचायत कार्यालय परीसरात उपोषणाला बसणार आहेत असा ईशारा श्री.कांबळी यांनी दिला आहे.तरी सर्व कनेक्शन धारक यांनी याची नोंद घ्यावी आणि नगरपंचायत आवारात जमावे.या वाडीतील लोक हे रेल्वे , वायमन गार्डन ,MIDC , टेलिफोन चे प्रकल्पग्रस्त आहेत , प्रकल्पग्रस्त असून देखील त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत अजूनपर्यंत दिली गेली नाही.तीन रुपये लिटर असलेला पाण्याचा दर बारा रुपये लिटर दराने आकारणी ही कुडाळ नगर पंचायत कडूनं केली जात आहे यामुळे 15 ऑगस्ट 2023 रोजी नगर पंचायत कार्यालय कुडाळ येथे संकाळी ८ वाजल्या पासून उपोषण करणार असल्याचे विजय कांबळी यांनी सांगितले आहे.
