✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

सावंतवाडी येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर हायस्कूल च्या येत्या शतकोत्तर रौप्य महोत्सव आणि विकासासंदभाँत विचारविनिमय करण्यासाठी शाळेच्या सवँ बँचच्या माजी विद्यार्थी, सभासद, पालक यांची सभा रविवारी 6 आँगस्ट ला सकाळी दहा वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित केली आहे.

शाळेच्या ई आकाराच्या इमारतीचे नुतनीकरण सुरु आहे. शाळा नव्या स्वरूपात पुढे येत असतांना भौतिक विकासा संदर्भात माजी विद्यार्थी, सभासद, पालक, देणगीदार यांच्याशी विचारविनिमय करणे. ज्यांना काही योगदान द्यायचे आहे, त्यासंदर्भात चचाँ करुन भविष्याचे नियोजन करणेसंबधी माजी विद्यार्थी, सभासद, देणगीदार, पालक यांची मते जाणून घेण्यात येतील. येत्या काळात शाळेचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव आहे. तसेच विकासात्मक काही कामांची बैठकीत चचाँ होणार आहे; तरी सवँ बँचचे माजी विद्यार्थी, सभासद, पालक,हितचिंतक, देणगीदार यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष द.म. गोठोस्कर, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रसाद नावेँकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page