✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ शहरातील गवळदेव मंदिरा नजीक विद्युत कामावर काम करताना विद्युत तारांचा शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या महादेवाचे केरवडे येथील कंत्राटी वायरमन धनंजय फाले (वय २६) याचे उपचारादरम्यान १५ दिवसांनी निधन झाले. त्याच्यामध्ये कंत्राटी कामगार व गावावर शोककळा पसरली आहे.

कुडाळ शहरातील गवळदेव मंदिरासमोर असलेल्या ११ केवी विद्युत खांबावर काम करण्यासाठी कंत्राटी कामगार धनंजय फाले हा २१ जुलै रोजी काम करत असताना त्याला विद्युत तारांचा शॉक लागून तो जखमी झाला होता. त्याच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले होते त्यानंतर त्याला गोवा बांबोळी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले होते.

पंधरा दिवस सुरू होते उपचार

विद्युत तारांचा शॉक लागून जखमी झालेल्या धनंजय फाले यांच्यावर गोवा बांबोळी येथे गेले १५ दिवस उपचार सुरू होते सुरुवातीच्या काळामध्ये त्याने उपचारांना प्रतिसाद दिला दरम्यान द्यावी त्याचा एक हात आणि एक कान निकामी झाला तरी त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र आज ४ ऑगस्ट रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

मदतीचे काय?

धनंजय फाले हा घरातील एकुलता एक कमवता युवक होता. त्याच्या पश्चात आई, वडील आहेत त्याच्या कुटुंबीयांना आता मदतीची गरज आहे. या मदतीसाठी यापूर्वी भाजप व कंत्राटी कामगार संघटनेच्यावतीने विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता तसेच कंत्राटदार यांना घेराव घातला होता मात्र त्या नंतर कोणताही निर्णय झाला नव्हता. आता या युवकाच्या आई-वडिलांना मदतीची गरज आहे त्यांच्या एकुलता एक मुलाचे निधन झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page