✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कसाल गावचे सरपंच माजी पंचायत समिती सदस्य राजन परब यांनी आज आपल्या सदस्यासह कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख व माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला
राजन परब हे आमचे राणे कुटुंबातले आहेत त्यांचे विकासाचे प्रश्न निश्चितच मार्गी लावले जातील आमच्या पक्षात त्यांचे स्वागत आहे असे पत्रकार परिषदेत भाजप नेते निलेश राणे यांनी सांगितले.

राजन परब हे गेले काही वर्षे राजकारणापासून अलिप्त होते अलीकडे झालेल्या कसालसारख्या मोठ्या ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष सरपंच उमेदवार म्हणून रिगणात राहून त्यांनी विजयाचा करिश्मा केला होता गावचा सरपच असलो तरी विकास हा महत्वाचा आहे हा दूरदृष्टीकोन ठेवून त्यांनी भाजप पक्षात जाण्याचा निर्णय घेतला त्यांचा आज हा प्रवेश माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील भाजप कार्यालयात झाला यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, जिल्हा बॅंक संचालक प्रकाश मोर्ये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, जिल्हा सरचिटणीस विनायक राणे, माजी सभापती बंड्या मांडकुलकर, मोहन सावंत, रुपेश कानडे, नागेश आईर, नागेश परब, तेजस माने, अरविंद परब, अँड राजीव कुडाळकर, भाजपचे गटनेते विलास कुडाळकर, माजी सभापती राजन जाधव, संदेश नाईक, दीपक नारकर, पप्या तवटे, राकेश कांदे, साईनाथ म्हाडदळकर साईराज दळवी युवा कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते.

भाजपचे नेते निलेश राणे म्हणाले, कसाल सरपंच राजन परब यांनी प्रवेशाबाबत इच्छा व्यक्त केली त्यांनी नारायण राणे यांच्या समवेत अनेक वर्षे काम केले  शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून विकास होऊ शकतो हे त्यांना पटल्यामुळे गावाच्या विकासासाठी ते आपल्या भाजप पक्षात आले आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आम. नितेश राणे कटिबध्द आहेत भविष्यात अधिक जलद गतीने जिल्ह्याचा विकास होणार आहे असे सागितले
श्री परब म्हणाले १९९० पासून मी आमचे नेते नारायण राणेसोबत आहे काही वर्षे मी राजकारणापासून अलिप्त राहिलो पून्हा एकदा विकासासाठी सत्तेची गरज असते आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याचा विकास हा भाजपच करू शकतो हे ठाम पटल्याने मी माझ्या सहकाऱ्यासोबत प्रवेश केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page