✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
शरद पवार हे आपले दैवत असले तरी अजित पवार यांनी सत्तेत गेल्याशिवाय जनतेची कामे होणार नाहीत ही भूमिका घेत निर्णय जाहीर केला.या निर्णयाला आपण बांधील राहिलो.अजित पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी असल्याने लोकाभिमुख काम आपला राष्ट्रवादी पक्ष करेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी वेंगुर्ला येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
वेंगुर्ला कॅम्प येथील महिला काथ्या कारखाना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना अबिद नाईक म्हणाले भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी यांचे सरकार असून आपला पक्ष तिन्ही पक्षातील लोकांना सोबत घेऊन वाटचाल करणार आहे.राष्ट्रवादीचा जुना कार्यकर्ता कितीही नाराज कार्यकर्ता असला तरी पुन्हा प्रवाहात आणणार.सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते एम. के. गावडे व महिला काथ्या उद्योगासारखा प्रकल्प राबवून जिल्ह्यातील अनेक महिलांना रोजगार देणाऱ्या प्रज्ञा परब यांच्यासारखे अनुभवी व्यक्ती पाठीशी ठाम उभी आहेत.जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून येत्या काळात आठही तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष संघटना मजबूत करणार असून सर्वसामान्य लोकांना न्याय देता येईल यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी सोबत यावे व जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष बलशाली करावा.तर कार्याध्यक्ष काका कुडाळकर बोलताना म्हणाले आपण राष्ट्रवादी मधून बाहेर पडलेलो नाहीत.संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवारांनी जी भूमिका घेऊन सत्तेत समाविष्ट झाले त्यांचे नेतृत्व मान्य करून अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार.कुडाळ सावंतवाडी मतदार संघाची जवाबदारी आपण घेतली आहे.जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता पक्षाशी जुळला जावा.राष्ट्रवादी पक्ष काही काळ मागे पडला होता, त्यांना महायुतीच्या माध्यमातून बळ देण्याचे काम करणार असून पुढील आडवड्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जिल्ह्यातील प्रमूख नियुक्त्या करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.तर पुढील काळात राजकारणातुन दूर असलेल्या व्यक्तींना पक्षात समाविष्ट करून पक्ष मजबूत करणार.तसेच शेतकरी व बागायतदार यांच्या समोरील प्रश्न सोडविण्यासाठी तसेच युवकांना व महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे एम. के. गावडे म्हणाले.यावेळी जिल्हा बँक माजी संचालक प्रज्ञा परब, प्रांतिक सदस्य सावळाराम अणावकर, माजी तालुकाध्यक्ष विलास गावकर, कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, कुडाळ मालवण विधानसभा युवक अध्यक्ष सर्वेश पावसकर, माजी ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष दिलीप वरने, माजी तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, सुभाष तांडेल, युवक अध्यक्ष सुरज परब, ऍड. प्रमोद धुरी, पेंडुर सामाजिक कार्यकर्ते नाना गावडे, माजी उपसरपंच प्रमोद शिरोडकर आदी उपस्थित होते.
