✍🏼लोकसंवाद /-समील जळवी,कुडाळ.

“हरित पहल” अंतर्गत कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या परिसरात कुडाळ येथील आयकर कार्यालयातर्फे व आयकर विभाग प्रमुख श्री.प्रताप बेहेरे.यांच्या हस्ते व सहकारी सतीश पाटील, सनदी लेखापाल- सुनील सौदागर ,के.एल.पाठक,जी.एस प्रभू, सागर तेली, राहुल वरसकर, प्रीती भाटिया इन्स्पेक्टर राजेश कुमार मीना, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ.व्यंकटेश भंडारी, बॅ. नाथ पै महिला व व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, सी बी एस ई सेंट्रल बोर्डाच्या प्राचार्य शुभांगी लोकरे, प्रीती केडगाळे,प्रा अनुष्का रेवंणडकर, बॅरिस्टर नाथ पै जुनियर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोस्कर, मंदार जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.झाला.

वृक्ष जाळी तयार करणे, छोट्या छोट्या वृक्षांच्या लागवडीतून रहिवासी वस्तीमध्ये लोकोपयोगी वनराई निर्माण करणे या उद्देशाने करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये सोनचाफा ,सुपारी, आवळा, मसाल्याच्या झाडांमध्ये दालचिनी तमालपत्री, जायफळ ,चिकू अशा विविध प्रकारच्या शंभर पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page