▪️राजू मसुरकर यांची पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे मागणी.
✍🏼लोकसंवाद/- सावंतवाडी.
खासगी कंपनी जिल्हा रुग्णालयासह सावंतवाडी व कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात एमआरआय तसेच सिटीस्कॅन मशीन बसविण्यास तयार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली परवागनी आणि जागा द्या, अशी मागणी सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. संबंधित कंपनीने वीस हजार उत्पन्न असलेल्या लोकांना मोफत सुविधा तर त्यापेक्षा उत्पन्न असलेल्या लोकांना शासनाच्या दरात सुविधा देण्याचे मान्य केले आहे. आपल्या खर्चात ते तीनही ठिकाणी यंत्रणा उभारण्यासह टेक्निशियन उपलब्ध करुन देणार • आहेत. त्यामुळे या मागणीचा सकारात्मक विचार करावा. त्यांना आवश्यक असलेली जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत आपण पालकमंत्री चव्हाण यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा केली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मसुरकर यांचे म्हणणे आहे.
