✍🏼लोकसंवाद /- देवगड.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पुरळ कसबा शाळेमधील एका शिक्षकाची कामगिरीवरती बदली पडेल येथे करण्यात आली आहे. सदर शिक्षकाची नियुक्ती पुरळ कसबा मुळ शाळेतच करण्यात यावी. किंवा दुस-या पर्यायी शिक्षकांची मणूक करण्यात यावी अन्यथा 25 जुलै पर्यंत कार्यवाही न झाल्यास बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्यात येईल असा विषयांचे निवेदन पंचायत समिती शिक्षण विभाग देवगड यांना पुसळ कसबा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय घाडी, श्रीनिवास मराठे, अमित पुरळकर आदी उपस्थित होते. सदर निवेदनामध्ये असे केले आहे की, पुरळ कसबा शाळेमधील पटसंख्ये नुसार चार नमुद शिक्षक मंजूर आहेत. यापैकी सध्या तीन शिक्षक कार्यरत होते. मात्र त्यापैकी एका शिक्षिकेची कामगिरी बदली पडेल शाळेमध्ये करण्यात आली. यामुळे या शाळेमधील 53 पटसंख्या असलेल्या मुलांना व 1 ली ते 7 वी वर्ग असलेल्या शाळेमध्ये दोनच शिक्षक कार्यरत असल्यामुळे विदयार्थी अप्रगत राहण्याचे प्रमाण वाढणार आहे. विषयानुसार दोन शिक्षक 1 ली ते 7 वी पर्यंतचे वर्ग कसे शिकविले जाणार असा प्रश्न पालक वर्गामध्ये निर्माण झाला आहे. यामुळे कामगिरीवरती बदली केलेल्या पुरळ कसबा शाळेतील शिक्षकाची बदली दुस-या शाळेमध्ये केलेली रदद करुन पुरळ कसबा शाळेतच नियुक्ती कायम करण्यात यावी अन्यथा 25 जुलै नंतर शाळाबंद आंदोलन करण्यात येईल असा ईशारा या निवेदनाव्दारे पुरळ शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिका-यांनी देवगड शिक्षण विभागाला दिला आहे.